Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात घडली.विजय मधुकर मेश्राम वय २६ वर्षे,रा.जुनोना,ता.जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना शनिवार २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घडली आणि आज सर्वत्र उघडकीस आली.
जुनोना येथील विजय मेश्राम शनिवारच्या सकाळी गाव नजीकच्या जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेला होता. दरम्यान,दुपारी १ वाजेच्या सुमारास जंगली भागात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्याच्यावर झडप घातली.यात विजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत वन विभागास कळवले.लागलीच मोहर्लीचे आरएफओ संतोष थिपे, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेगावकर व पथक,मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठवला.दरम्यान,वन विभागाकडून मृतक तरुणाची आई निरंजना मधुकर मेश्राम यांना ५० हजार ५०० रुपयांची तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हल्ल्यातील बळींची संख्या वाढतीवर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!