- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिट अंतर्गत येणाऱ्या जीवनापूर येथील तरुणाला वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रवीण मेघश्याम चिमलवार वय ३० वर्षे,रा.जीवनापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे.जीवनापूर येथील प्रवीण हा गावाशेजारी जंगल परिसराम भटकत होता.त्यातच तो काल गुरुवारी गावापासून काही अंतरावर एका शेताच्या नाल्याजवळ बसून असतांना वाघाने त्याच्यावर हल्ला केला.हल्ला करताच त्याने आरडाओरड केल्याने वाघाने जंगलात पलायन केले. काही वेळानंतर सदर घटना लोकांच्या लक्षात आली असता त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरूप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक अरविंद माने व वनरक्षक पंडित मेकेवाड यांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा केला.जखमीला सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.घटनास्थळी कॅमेरे लावून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.परिसरातील शेतकऱ्यांना शेतावर काम करतांना सावधानता बाळगण्याची सूचना वनविभागाद्वारे देण्यात आली आहे.
- Advertisement -

