Thursday, July 30, 2026
Homeचंद्रपूरलाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न निष्फळ ठरून तब्बल ३ लाख ३६ हजार ७६८ रुपये किंमतीचा विदेशी दारूसाठा व ५ लाख रुपये किंमतीची कार,असा एकूण ८ लाख ३६ हजार ७६८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात भद्रावती पोलिसांना यश आले आहे.मात्र,पोलिसांना चकमा देणारा कारचालक कार घटनास्थळी ठेवून फरार झाल्याने त्याचा शोध घेतला जात आहे.सदरची धडक कारवाई आज,गुरुवार ३० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास भद्रावती तालुक्याच्या घोडपेठ गाव परिसरात करण्यात आली. प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-७१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रावती पोलिसांना आज पहाटेच्या सुमारास एमएच ०४ एचएफ १२०८ क्रमांकाच्या कारने नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार, भद्रावती पोलिसांनी भद्रावती टप्पा या ठिकाणी नाकाबंदी केली.नाकाबंदीदरम्यान संशयित  कार दिसताच पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र,वाहन चालकाने वाहन न थांबवता चंद्रपूरच्या दिशेने भरधाव वेगाने पळ काढला असता पोलिसांनी पाठलाग सुरू केला.पाठलागादरम्यान चालकाने वाहन घोडपेठ गावातील वस्तीच्या दिशेने वळवले.सदरची कार दिसेनाशी झाल्याने पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता काही अंतरावर संशयित कार बेवारस अवस्थेत आढळून आली.कारची तपासणी केली असता त्यात २ लाख ९५ हजार ४८८ रुपये किंमतीच्या ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १ हजार ७२८ निपा,तसेच ४१ हजार २८० रुपये किंमतीच्या ९० मिलीच्या ४८० निपा असा एकूण ३ लाख ३६ हजार ७६८ रुपये किंमतीचा विदेशी दारूसाठा आढळून आला. याशिवाय,पाच लाख रुपये किंमतीची कारही जप्त करण्यात आली.सदरची कारवाई भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पीएसआय संतोष केदार,गजानन तुपकर यांचेसह पथकाने पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!