Sunday, July 12, 2026
Homeभंडारारेती चोरीचे पडसाद विधानसभेत; घाट चालवतांनी कोतवालापासुन जिल्हाधिकारी,महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री...

रेती चोरीचे पडसाद विधानसभेत; घाट चालवतांनी कोतवालापासुन जिल्हाधिकारी,महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत.. – तर पोलीस शिपाई पासुन ते पोलीस अधिक्षक, गृहमंत्री व मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणे-घेणे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रेती चोरीचे पाळेमुळे मुळापासून खोलवर रुजलेले आहेत.रेतीचोरीच्या व्यवसायात ‘टॉप टू बॉटम’ हात ओले होत आहेत.त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही.शासनाची बदनामी होत आहे.रेतीच्या घाटाबद्दल माहिती दिली नाही,अशा आशयाचे पत्र आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसीलदारांना दिले.त्या पत्राचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. याबाबत जयंत पाटील यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार राजू कारेमोरे यांचे पत्र वाचून दाखवत हे आरोप गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले.यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.या पत्राची दखल नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे,कशी घेतात हे लवकरच समजणार आहे.
आमदार राजू कारेमोरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,ता.मोहाडी जि.भंडारा येथील बेटाळा,निलज,कान्हळगाव,मुंडरी,मोहगाव देवी, पाजरा,रोहा या काही घाटावर रेती डेपो आहेत व काही घाटावर डेपो नाहीत.ज्या कोणी ठेकेदारांनी सदर डेपो किंवा घाट घेतलेले आहेत,ते फक्त नाममात्र आहेत.सदर संपूर्ण घाट व डेपो वैद्य पध्दतीने किंवा नियमानुसार न चालवता अवैद्य पध्दतीने व नियम धाब्यावर बसवून चालवत आहेत.हे संपूर्ण घाट खनीज अधिकारी,कर्मचारी,आपण व आपले चेले-चपाटे चालवित आहेत.जनसामान्यात अशी सुध्दा चर्चा आहे की,घाट चालवतांनी कोतवालापासुन ते जिल्हाधिकारी,महसुल मंत्री व खनिकर्म मंत्री यांच्यापर्यंत तसेच पोलीस शिपाई पासुन ते पोलीस अधिक्षक,गृहमंत्री व मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांना देणे-घेणे करण्यात येते.त्यामुळे कुणीच आमचा बाल-बाका करू शकत नाही.असे आपले चेले-चपाटे जनतेमध्ये सांगत असल्यामुळे शासनाची व जनप्रतिनीधींची जनतेमध्ये खूप बदनामी होत आहे.काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हातासी घेवून मोठया प्रमाणात हे काळे काम चालत आहेत.त्यामुळे विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे. रेती,मॅगनीज गौण खनिज चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत.मौजा बेटाळा ता.मोहाडी,जि.भंडारा येथे लोकेश चारय बुधे या मुलाचा रेती घाटावर नर बळी देण्यात आलेला आहे,अशी सुध्दा चर्चा आहे. आपल्याकडून शासनाच्या जी आर ची मागणी केली तरी सुध्दा आपण मला कुठल्याच प्रकारच्या जी आर किंवा यादी,घाटाबददल कुठलीच माहिती दिली नाही व जन प्रतिनिधीच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली.शासनाचे सध्याचे वाळू धोरणाचे व डेपो चालविण्याबददल जे काही जी आर निघाले आहेत, त्यांची संपूर्ण माहिती माझ्या कार्यालयाला द्यावी.जर तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र किंवा संपूर्ण भंडारा जिल्ह्याला बिहार बनवायचे नसेल तर आपण वरील गैरप्रकार त्वरीत थांबवावे.आपणाला पत्रादवारे असेही कळविण्यात येते की जर भविष्यात एखादी अप्रिय घटना घडली तर सर्वस्वी जबाबदारी आपलीच राहील याची योग्य ती नोंद घ्यावी; असे नमूद पत्रात आमदार राजू कारेमोरे यांनी म्हटले आहे.त्यातच जयंत पाटील यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर पत्राचा मुद्दा उचलून धरल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!