Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूररुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतांनाही बाहेरून औधष आणायला लावणे खपवून घेणार नाही... - रुग्णालयातील...

रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतांनाही बाहेरून औधष आणायला लावणे खपवून घेणार नाही… – रुग्णालयातील विविध समस्यांवर आमदारांनी खडसावले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालय येथे जिल्हासह बाहेर जिल्हातील रुग्ण उपचाराकरिता येत असतात.त्यामुळे रुग्णांचे समाधान होईल; असे उपचार येथे झाले पाहिजे.रुग्णांशी तथा त्यांच्या नातलगांशी आपली वागणुक योग्य असली पाहिजे. अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.रुग्णालयातील अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.ती तात्काळ दुर करा.आपण येथे १०० पिण्याच्या पाण्याच्या कॅन उपलब्ध करून दिल्या आहेत.येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आणखी काही उपाययोजना असेल तर त्या रुग्णालय प्रशासनाने सुचवाव्यात अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

रुग्णालयातील ब्लड स्टेटींग लॅबच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत.रुग्णांच्या रक्ताचा नमुना प्राप्त झाल्या नंतर त्याचा अहवाल कमीत कमी वेळेत देण्याचा प्रयत्न करा; ब्लड लॅब येथील व्यवस्था सुसज्ज करा, आयसीयूच्या अनेक बेडवर ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. पाहणी दरम्यान प्रसुतीकक्षात रुग्णांना बाहेरून औषध

लिहून देत असल्याची तक्रार रुग्णांनी केली.यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतानाही बाहेरून औधष आणायला लावणे हा प्रकार गंभीर आहे.यापुढे हे खपवून घेतल्या जाणार नाही.हे प्रकार बंद करा अशा सूचना यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची पाहणी केली.यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके,उप निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, डॉ. तेजस्वीनी चौधरी, डॉ. रोहित होरे, डॉ. प्रशांत मगदुम, डॉ. ऋतुजा गनगारडे आदींची उपस्थिती होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!