Wednesday, August 5, 2026
Homeआरमोरीरानटी हत्तींचा हैदोस; पायदळी तुडवले मका पीक.. - शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुधारा; आमदार...

रानटी हत्तींचा हैदोस; पायदळी तुडवले मका पीक.. – शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुधारा; आमदार मसराम शेत बांधावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या इंजेवारी येथील शेत परिसरात रानटी हत्तींनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या उभ्या मका पिकांची नासधूस करून संपूर्ण मका पीक पायदळी तुडवल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.सदर घटनेची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांना मिळताच लगेच त्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतातील नुकसानीची पाहणी करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसाभरपाईची देण्याची मागणी केली.
गेल्या ३ वर्षांपासून रानटी हत्ती गडचिरोली जिल्ह्यात भ्रमंती करीत आहेत.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींनी जिल्ह्यातील जंगलांचा जणूकाही ताबाच घेतला असल्याचे दिसून येत आहे.
कधी गडचिरोली तालुका तर कधी कुरखेडा,देसाईगंज व इतर तालुक्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतातील झोपडी,भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे.अशातच काल,गुरुवारी १३ मार्चला रानटी हत्तींनी आरमोरी तालुक्यात प्रवेश करून इंजेवारी येथील शेतकऱ्यांच्या मका पिकांची नासधूस करून शेतातील पाईप लाईन फोडली.आमदार रामदास मसराम शेत बांधावर जाताच एका वयस्कर शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुधाराचा बांधच फुटला होता.मसराम यांनी धीर देत वनाधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून तात्काळ पंचनामे करून नुकसाभरपाई देण्याची मागणी केली व रानटी हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.प्रसंगी आमदार रामदास मसराम,आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,युवक कँग्रेस विधानसभा अध्यक्षकमलेश बारस्कर व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!