- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोरेगांव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचासह तीन सदस्यांचे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवीत गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकतेच आदेश काढून अपात्र ठरविले आहे.यात सरपंचा कुंदा तुळशीराम वाघाडे(गायकवाड)सदस्य डाकराम मोतीराम राऊत,पुष्पा जगन दुधकुवर व अशोक वासुदेव राऊत यांना पद गमवावे लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायत कोरेगांव येथील सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोंबर २०२२ मध्ये पार पडली.त्यात अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर सौ.कुंदा तुळशीराम वाघाडे सरपंच,सदस्य डाकराम राऊत, पुष्पा दुधकुवर व अशोक राऊत हे सदस्य म्हणून निवडून आले.वरील सरपंच तथा सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करुन जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती गडचिरोली यांनी अवैध ठरविले आहेत.त्यामूळे हे निश्चित झाले आहे की,वरील सर्व सभासद हे अनुसूचित जमातीमध्ये मोडत नाही, त्यामूळे त्यांना तात्काळ पदमुक्त करुन खऱ्या आदिवासी जनतेला न्याय द्यावा; असा पदमुक्त करण्याबाबत तक्रार अर्ज दिनांक-२० ऑगस्ट,२०२४ रोजी अध्यक्ष,उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष,जय पेरसापेन आदिवासी विकास मंडळ, कोरेगांव यांनी जिल्हाधिकारी,गडचिरोली यांचे न्यायालय प्रकरण क्रमांक-२०/एमआरसी- ८१/२०२४-२५ नुसार दाखल केला होता.त्यानुसार सरपंच तथा सदस्य यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.त्यामुळे काहीकाळ सुनावणीस स्थगिती देण्यात आली.महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३ चे कलम १० (१) ‘अ’ नुसार राखीव जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तिने ती निवडून आल्याचे घोषित झाल्याचे दिनांकापासून १२ महिण्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.त्यातच सदर प्रकरणात कोरेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचा कुंदा तुळशीराम वाघाडे(गायकवाड)सदस्य डाकराम मोतीराम राऊत, पुष्पा जगन दुधकुवर व अशोक वासुदेव राऊत यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका ठेवीत गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी अनर्ह(अपात्र) ठरविले आहे.
- Advertisement -

