Sunday, August 30, 2026
Homeमुंबईमोठी बातमी अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे..

मोठी बातमी अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्याच्या बारामती येथे बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले.तर काल गुरुवार २९ जानेवारी रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अश्यातच आता राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडीस सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे, अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.सुनेत्रा पवार ह्या अजित पवारांच्या पत्नी आहेत.सुनेत्रा पवार यांच्या रुपात महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.उद्या,शनिवार ३१ जानेवारी रोजी त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे.सुनेत्रा पवार उद्या सायंकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.उद्याला राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील.या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल.यानंतर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे.ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!