Friday, June 19, 2026
Homeगोंदियापतीच्या नजरेसमोरच वाघाची झडप; वाघाच्या हल्ल्यात पत्नी ठार..

पतीच्या नजरेसमोरच वाघाची झडप; वाघाच्या हल्ल्यात पत्नी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-पती-पत्नी दोघेही शेतात कामे करीत असतांनाच पतीच्या नजरेसमोरच पत्नीवर वाघाने हल्ला चढवला.अश्यातच आरडाओरड केली असता वाघाने पळ काढला.मात्र,वाघाने चढविलेल्या हल्ल्यात महिलेने प्राण गमावल्याची चित्तथरारक घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली गाव परिसरातील शेत शिवारात काल शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.अचानकपणे घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.लक्ष्मी हेमराज सयाम वय ६० वर्षे,रा.माहुली,ता.सडक अर्जुनी असे वाघाने हल्ला चढवून ठार केलेल्या  महिलेचे नाव आहे.
दोघेही पती-पत्नी काल शुक्रवारी शेतात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेले होते.तुरीच्या शेंगा तोडत असतांनाच अचानकपणे वाघाने लक्ष्मी सयाम यांच्यावर झडप घातली.पती हेमराज हे जवळच असल्याने वाघ पाहून घाबरले आणि जोर-जोराने ओरडू लागले.ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी धावून गेले.वाघाने महिलेला पकडुन ठेवल्याचे पाहून आरडाओरड करण्यास सुरुवात केली.यामुळे वाघाने महिलेस जागीच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला.वाघाने केलेल्या झडपेने महिलेचा जागीच मृत्यू झाला.लागलीच उपस्थित शेतकऱ्यांनी घटनेची माहिती वन विभाग व पोलिसांनी दिली.त्यानुसार,सडक अर्जुनी वनविभागाचे प व डुग्गीपार पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेनंतर गावकऱ्यांनी आक्रमक होत वाघाचा त्वरित बंदोबस्त करा,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर वनविभागाने वाघाला बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!