- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार
अभिनयाने प्रसिद्ध “सैराट” फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचे आज,शनिवार ३१ जानेवारी रोजी भंडारा शहरात आगमन होणार आहे.विशेष म्हणजे, उद्या,रविवार १ फेब्रुवारी भंडारा जिल्ह्याच्या बेला ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष प्रचार आणि प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोहिमेला बळ देण्यासाठी मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या या भेटीमुळे ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांना आणि लोकचळवळीला नवा उत्साह मिळण्याची शक्यता आहे.नियोजित कार्यक्रमानुसार रिंकू आणि राज्यस्तरीय चमुचे आज भंडारा शहरात आगमन होईल.त्या रात्री तिथेच मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी उद्या रविवारी सकाळी ९.४० वाजता बेला ग्रामपंचायतला भेट देतील.यावेळी त्या राज्यस्तरीय पथकासोबत अभियानाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधतील.जिल्हा परिषद प्रशासनाने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

