- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्याच्या बारामती येथे बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले.तर काल गुरुवार २९ जानेवारी रोजी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अश्यातच आता राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडीस सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे, अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.सुनेत्रा पवार ह्या अजित पवारांच्या पत्नी आहेत.सुनेत्रा पवार यांच्या रुपात महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.उद्या,शनिवार ३१ जानेवारी रोजी त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे.सुनेत्रा पवार उद्या सायंकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.उद्याला राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील.या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल.यानंतर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे.ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे.
- Advertisement -

