Monday, September 28, 2026
Homeआरमोरीमुरूम उत्खनन परवाना शंभर ब्रास ; वाहतूक होतेय तीनशे ब्रास...!- आरमोरी तालुक्यातील...

मुरूम उत्खनन परवाना शंभर ब्रास ; वाहतूक होतेय तीनशे ब्रास…!- आरमोरी तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन जोमात; प्रशासन गेले कोमात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी :- तालुक्यात अवैधरित्या रेती तस्करी बरोबरच तस्करांचा कल अवैधरित्या मुरूम उत्खननाकडे वाढलेला दिसून येत आहे. महसूल विभागाकडून मुरूम उत्खननाचा शंभर ब्रासचा रीतसर परवाना मिळवून त्यापेक्षा अधिक मुरुमाची वाहतूक करून शासनास लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याने अशा अवैधरित्या उत्खनन करणाऱ्यांचे परवाने रद्द करून व उत्खनन केलेल्या ठिकाणचा मोका पंचनामा व चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.

काही मुरूम तस्कर कुठल्याही प्रकारचा महसूल विभागाकडून रीतसर वाहतूक परवाना न घेता अवैधरित्या उत्खनन करतांना दिसून येत आहेत.त्याहीपेक्षा रॉयल्टी काढून परवाना घेतलेले काही तथाकथित एका वाहतूक परवाण्यावर तीन ते चार ब्रास अवैधरित्या वाहतूक करतांना दिसून येतात  एका वाहतूक परवाण्यावर सकाळचा कालावधी दिलेला असेल तर तोच वाहतूक परवाना दुपारच्या सुमारासापर्यंत चालविण्यात येतो आहे.एखादा अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी वाहतूक परवाना तपासले असता उडवाउडवीची उत्तरे त्यांच्याकडे तयारच असतात.कधीकधी तर चक्क काही नागरीकांना खरेदीची वाहतूक परवाने सुध्दा दिली जात नाही. त्यामुळेच अवैध उत्खनन करण्यास चालना मिळून शासनास लाखो रुपयांचा चुना लावल्या जातो आहे.यासाठी महसूल विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

अवैधरित्या मुरूम उत्खनन करण्याऱ्यांवर कठोर कारवाई करून,उत्खनन केलेल्या ठिकाणचा मोका पंचनामा करून,अवैध गौण खनिज प्रकरणी कारवाई करण्यात यावी.अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!