Sunday, July 19, 2026
Homeमुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहिण योजने विषयी केला मोठा खुलासा.. - २१००...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहिण योजने विषयी केला मोठा खुलासा.. – २१०० रुपयांसाठी ‘या’ महिन्यापर्यंत करावी लागणार प्रतीक्षा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागल्यानंतर काल गुरुवारी मोठ्या दिमाखात शपथ विधीचा सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल,असे आश्वासन दिले. ‘आगामी काळात सुडाचे राजकारण चालणार नाही. शपथविधीला उद्धव ठाकरे,शरद पवार,राज ठाकरे अशा प्रमुख नेत्यांना मी फोन करून निमंत्रण दिले.महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पूर्ववत व्हावी,यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार असून, निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना २१०० रुपये दिले जातील.मात्र,त्याचा विचार आम्ही आगामी अर्थसंकल्पात करू,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत अद्वितीय आणि अभूतपूर्व यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना २,१०० रुपयांच्या मदतीसाठी एप्रिल २०२५पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!