Thursday, October 22, 2026
Homeकुरखेडाअखेर शेतकऱ्यांच्या धानाचे पुंजणे जाळणारा अटकेत; कुरखेडा तालुक्यातील घटना..

अखेर शेतकऱ्यांच्या धानाचे पुंजणे जाळणारा अटकेत; कुरखेडा तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या मौशी(पलसगड)येथील पोलिस पाटील टीकाराम सहारे व आनंदीबाई बोदेले या दोन शेतकऱ्यांच्या धानाचे पुंजणे मागील महिन्याच्या दिनांक-१३ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाकडून जाळण्यात आले होते.त्यामुळे हताश व चिंताग्रस्त दोन्ही शेतकऱ्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी त्यावेळी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला होता.अशातच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तक्रार देणाऱ्या शेतकरी आनंदीबाई बोदेले यांचा नातेवाईक कुरखेडा तालुक्याच्या वाकडी गावातील राजकुमार मधुकर राऊत वय २६ वर्षे याने दोन्ही  शेतकऱ्यांचे ४ एकर शेतीतील ३ धानाचे पुंजणे बोदेले यांच्याशी पूर्ववैमनस्यातून १३ नोव्हेंबर रात्री जाळले असल्याची कबुली दिली.पोलिसांनी राजकुमार राऊत यास अटक करून कुरखेडा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!