- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील व्यायामशाळेचे इमारत बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे झालीत.पण,आजतागायत सदरच्या व्यायामशाळेत कोणतेही साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व नंतर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
विशेष म्हणजे,व्यायामशाळेची इमारत बांधण्यात आली खरी; पण त्यात कोणतेही साहित्य नसल्याने परिसरातील युवकांना व्यायामाची सुविधा मिळत नाही.युवकांच्या हितासाठी आवश्यक उपकरणे,वजन प्रशिक्षण साहित्य व इतर साहित्यांचा पुरवठा करणे आवश्यक होते.मात्र, ‘उभा आणि शोभा’ असे करून नगर परिषदेने हात वर केल्याचे दिसून येते.यापूर्वीही साहित्य पुरवठा करण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी,अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती.परत पुनश्च एकदा भाजपा शहर अध्यक्ष सचिन खरकाटे,जिल्हा सचिव सचिन वानखेडे तसेच भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष कपिल बोरकर,कुलदीप आमले महामंत्री भारतीय जनता पार्टी देसाईगंज,आकाश घोरमोडे महामंत्री भारतीय जनता पार्टी व इतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद प्रशासनाने सदरचा विषय गांभीर्याने घेऊन शक्य तितक्या लवकर व्यायाम शाळेत साहित्य उपलब्ध करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.
- Advertisement -

