Wednesday, June 10, 2026
Homeचंद्रपूरब्रम्हपुरी-आरमोरी मार्गावर सापळा; वन्य प्राण्यांची शिकार करणारे दोघेजण ताब्यात..

ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गावर सापळा; वन्य प्राण्यांची शिकार करणारे दोघेजण ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून चोरटी वाहतूक केली जात असल्याची गुपित माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या(एलसीबी) पथकास मिळताच ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचत दोघांना अटक करून त्यांच्याकडून तीन मृत जंगली डुक्कर,भरमार बंदूक, दारुगोळा व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची घटना आज,शुक्रवार १८ जुलै रोजी ब्रम्हपुरी शहरात उघडकीस आली.३१ वर्षीय कुंदनसिंग शेरसिंग भुराणी व २१ वर्षीय विजयसिंग सुरतसिंग भुराणी दोघेही रा.पेठ वार्ड,ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.एलसीबी पथकास माहिती मिळताच रेल्वे क्रॉसिंगजवळ एका मोपेड वाहनास थांबविले.सदर वाहनाची तपासणी केली असता, तपासादरम्यान वाहनात ३ मृत जंगली डुक्कर,१ भरमार बंदूक (अग्नीशस्त्र), दारुगोळा व शिकारीसाठी लागणारे इतर साहित्य आढळून आल्याने प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ तसेच शस्त्र अधिनियम विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त सामग्री वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर,पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस अंमलदार गणेश भोयर,अजित शेंडे,नितेश महात्मे,प्रदीप मडावी यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!