Monday, August 31, 2026
Homeभंडाराबोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम जमा..ज्यांच्याकडे शेतीच नाही..-लाखो रुपयांचा घोटाळा….

बोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम जमा..ज्यांच्याकडे शेतीच नाही..-लाखो रुपयांचा घोटाळा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील दि सहकारी संस्था पिंपळगाव यांनी लाखो रुपयाचा घोटाळा केल्याचे बोलले जात आहे.दि सहकारी संस्था पिंपळगाव ‘अ’ गटातील धान खरेदी केंद्र आहे.२०२३-२४ हंगामात शासनाने सरसकट हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला.ज्या शेतकऱ्यांनी सात बारा ऑनलाईन केला अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले.पण पिंपळगाव येथील धान खरेदी केंद्रावर जे शेतकरीच नाहीत अशा नागरिकांचे बोगस सातबारा काढून ऑनलाइन करण्यात आले.त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम सुद्धा जमा झाली.एकट्या पिंपळगाव धान खरेदी केंद्रावर २५ बोगस शेतकरी आढळून आले आहेत.या विषयी दि सहकारी संस्था यांना विचारले असताना त्यांनी सांगितले की,हे सातबारे डाटा ऑपरेटर यांनी ऑनलाईन कसे केले याची माहिती नाही.त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत.महत्त्वाची बाब ही आहे की ज्यांच्या नावाने बोनसची रक्कम उचललेली आहे त्यांच्याकडे शेतीच नाही.मग त्यांचे सातबारे तयार झालेच कसे तलाठ्यांनी सुद्धा सातबारा दिला नाही. पण डूप्लिकेत सातबारे आलेच कुठून? हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले जात आहे.वेगवेगळ्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावांनी पैशाची उचल झाली आहे.हा प्रकार पिंपळगाव आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड झाला असून चौकशी केली तर जिल्हाभर असा प्रकार आढळू शकतो;असेही सांगितले जात आहे.मात्र अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.

जिल्हा पणन अधिकारी यांना माहिती मिळाली पण आपल्याला कोणीही तक्रार केली नाही त्यामुळें कारवाई कशी करणार? असे उत्तर त्यांनी दिले आहे. पणन अधिकारी रजेवर असल्याने जिल्हाधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.पण शासनाच्या डोळ्यात धूळ घालून हा घोटाळा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.घोटाळेबाजांना कोणाचे सहाय्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तेव्हा यंत्रणेलाचा हाताशी घेऊन बोगस शेतकरी दाखवून शासनाला लुटण्याचा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!