Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरफेरफारची माहिती न दिल्या प्रकरणी राज्य माहिती आयोगाने ठोठावला दंड...- शारीरिक,मानसिक व...

फेरफारची माहिती न दिल्या प्रकरणी राज्य माहिती आयोगाने ठोठावला दंड…- शारीरिक,मानसिक व आर्थिक त्रासासाठी ५ हजार रुपये नुकानभरपाईचा आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भद्रावती (चंद्रपूर) :- गौतमनगर येथील रहिवासी विठ्ठल कृष्णाजी गारसे यांनी २२ जून २०२० रोजी तालुक्यातील चीचोर्डी येथील सर्व्हे क्रमांक १०२/३ मधील प्लॉट क्रमांक ३७ च्या फेरफार प्रकरणाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती.

या अर्जावर जनमाहिती अधिकारी,वरोरा यांनी विहित मुदतीत अपिलार्थीस कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपिलार्थी विठ्ठल गारसे यांनी २२ जुलै २०२० रोजी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली.मात्र प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी देखील प्रथम अपील अर्जावर सुनावणी घेतली नाही. त्यानंतर अपिलार्थी विठ्ठल गारसे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम १९ (३) नुसार आयोगाकडे दिनांक ७ सप्टेंबर २०२० ला द्वितीय अपील दाखल केली. त्यानुसार ११ जुलै २०२२ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली.

त्या सुनावणीत जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलीय अधिकारी अनुपस्थित होते.त्यामुळे राज्य माहिती आयोगाने शिस्तभंगाची कारवाई करून प्रथम अपिलीय अधिकारी व जन माहिती अधिकारी यांचेवर अपिलार्थीना दिलेल्या त्रासासाठी ५ हजार रुपये दंड व मागितलेली माहिती विनामूल्य देण्याचे आदेश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!