Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीसावधान....!१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे लग्न करणे पडणार महागात....- दोन वर्षे तुरुंगवासाची...

सावधान….!१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे लग्न करणे पडणार महागात….- दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा; एक लाखाचा दंड 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सध्याच्या घडीला सगळीकडेच लगीनघाई सुरू झाली असल्याने यंदा बऱ्यापैकी जोडपी विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. विवाहाच्या बंधनात तर अडकणार; मात्र कायद्याचे पालनही करणे तितकेच महत्त्वाचे आहे.असाच एक कायदा २००६ मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला असून १० नोव्हेंबर २००७ मध्ये सर्वत्र लागू करण्यात आला आहे.

बालविवाह कायदा मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे.मुलीचे वय १८ पेक्षा कमी आणि मुलाचे २१ पेक्षा कमी असेल तर तो बालविवाह समजला जातो.यास बेकायदा समजला जातो.जास्त वयाच्या पुरुषाने जर १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत विवाह केला; तर त्याला दोन वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.त्यासोबत मुला-मुलीचे आई-वडील,नातेवाईक यांच्यावरही कारवाई होऊ शकते.

जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाची करडी नजर बालविवाहांवर ठेवली जात असल्याने बालविवाह करू नका; असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!