Saturday, September 26, 2026
Homeगोंदियाशेतकरी गेला आपबिती सांगायला अन भलतेच सांगितले साहेबाने...! ईटीयाडोह...

शेतकरी गेला आपबिती सांगायला अन भलतेच सांगितले साहेबाने…! ईटीयाडोह पाटबंधारे विभागातील प्रकरण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया:- आमगाव तालुक्यातील बनगाव येथील शेतकरी शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नसल्याने याची तक्रार करण्यासाठी ईटीयाडोह पाटबंधारे विभागाच्या शाखा व्यवस्थापकाकडे गेले असता; त्यांनी उपाययोजना सूचविण्याऐवजी शेतात पाणी पोहोचत नसेल तर शेती कशाला करता? असा अजब-गजब सल्ला दिल्याने शेतकरी बांधव नाराज होऊन संताप व्यक्त करीत आहेत.

शेतकरी बांधव खरीप हंगामासह रब्बी हंगामात सुद्धा शेतीची मशागत करीत असतात.यंदा ४५ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली.मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येसुद्धा पुरेसा पाणीसाठा आहे.त्यामुळे अनेक शेतकयांनी रब्बी विभागाच्या कालव्याद्वारे पाणी दिले जाते.पण काही शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम संकटात आला आहे.बनगाव येथील शेतकरी सुखराम थेर यांच्या शेतात कालव्याचे पाणी पोहोचत नाही त्यामुळे या संदर्भात त्यांनी संबंधित ईटीयाडोह व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तक्रार केली.

त्यानंतर शाखा अभियंता आणि कालवा निरीक्षक यांनी थेर यांच्या शेतीला भेट दिली.शेतात पाणी जाण्यासाठी जवळ मोंगाड पायली बसविण्याची परवानगी द्यावी किंवा पंप बसवून शेतीची लागवड करण्याची मुभा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केली व उलट शेतकऱ्याला शेती कशाला करता? असा अफलातून सल्ला दिल्याचे शेतकरी सुखराम थेर यांनी सांगितले.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून सदर प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे थेर यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!