- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील हिरापुर टोल नाक्याजवळ चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे भरधाव वेगात निघालेली केजी एन नामक ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली.यात ट्रॅव्हल्स मधील तब्बल ३५ ते ४० प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने अनेकजण जखमी झाले तर यातील काहीजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २४ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
आज शनिवारी दुपारच्या सुमारास एमएच ३४ जीपी १७३६ क्रमांकाची खासगी बस ट्रॅव्हल्स चंद्रपूरवरून गडचिरोलीकडे भरधाव वेगात निघालेली असतांनाच सावली तालुक्याच्या हिरापुर टोल नाक्याजवळ येताच एका दुचाकीला वाचविण्याच्या नादात ट्रॅव्हल्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅव्हल्सच्या आतमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून सावली पोलीस प्रशासनास माहिती दिली.माहीती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून किरकोळ जखमींना सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले,तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अद्याप जखमींची नावे कळू शकली नाही.घटनास्थळी काहीकाळ नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
- Advertisement -

