Thursday, June 4, 2026
Homeचंद्रपूरपैश्यासाठी पोटच्या पोराने वडिलाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून केले ठार..

पैश्यासाठी पोटच्या पोराने वडिलाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका ३५ वर्षीय पोटच्या पोराने क्षुल्लकशा वादातून रागाच्या भरात वडिलाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील शेगावातील विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरात काल शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.अभय गुलाब दातारकर असे आरोपी मुलाचे नाव आहे,तर ६५ वर्षीय गुलाब पत्रुजी दातारकर असे मृताचे नाव आहे.
  • शेतीच्या पैश्याचा वाद👇
काही वर्षापूर्वी गुलाब यांनी शेती विकली होती.शेती विकल्याने आरोपी अभय वडिलांना पैश्याची मागणी करायचा.यासाठी तो नेहमी पैशावरून आई-वडिलांसोबत वाद घालायचा.अश्यातच काही दिवसांपूर्वी त्याने पैश्यासाठी वडिलांना मारहाण केली होती.काल शनिवारी सकाळपासूनच बाप व मुलामध्ये पैश्यासाठी भांडण सुरू झाले.भांडण सुरू असतांनाच मुलाचा राग अनावर झाला आणि घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली व वडिलांच्या डोक्यात मारली.यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला.प्रकरणी मृताची पत्नी इंदू दातारकरने पोलिसांत तक्रार केली.यावरून मुलास अटक करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!