Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरधावत्या ट्रकचा वेग कमी झाल्याने भरधाव मालवाहू गाडी ट्रकवर आदळली.. - एकजण...

धावत्या ट्रकचा वेग कमी झाल्याने भरधाव मालवाहू गाडी ट्रकवर आदळली.. – एकजण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-परतीच्या वाटेवर असतांना त्याच मार्गावर ट्रक जात होता.ट्रकमध्ये अचानकपणे बिघाड झाल्याने ट्रकचा वेग कमी झाला आणि मागून भरधाव वेगात असलेल्या आयशर मालवाहतूक गाडीची ट्रकला जोरदार धडक बसली.यात आयशर गाडीतील एकजण जागीच ठार झाला,तर दोघे गंभीर जखमी झाले.झालेल्या अपघातात साकिर समशेर अली वय ३६ वर्षे,रा.देवलापार, ता.रामटेक,जि.नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला.तर विजय सोदराम कुमरे वय ३५ वर्षे आणि विलास चरण कोडवते वय २८,दोघेही रा.निमटोला,देवलापार, ता.रामटेक दोघे गंभीर जखमी झाले.सदरची घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील हरणाकुंड नाल्याजवळील कट्टा शिवारात पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.
रामटेक तालुक्याच्या देवलापार येथील व्यापारी हेमंतकुमार जैन यांचा किराणा व्यवसाय आहे.साकिर अली हे जैन यांच्या मालकीच्या एमएच ४० वाय ४००९ क्रमांकाची आयशर मालवाहतूक गाडी चालवायचे. घटनेच्या वेळी सदरची मालवाहतूक गाडी ही नागपूरला किराणा साहित्य आणण्यासाठी गेली होती.साकिर अली सह दोघेजण सहप्रवासी होते.रात्रीच्या सुमारास किराणा साहित्य घेऊन नागपूरवरून देवलापारकडे निघाली होती. देवलापारपासून तीन किलोमिटर अंतरावर असतांना
हरणाकुंड नाल्याजवळील कट्टा शिवारात समोर
नागपूरहून येत असलेला एमएच ४० बीएल २५१२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्याचा वेग कमी झाला.त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या मालवाहतूक आयशर गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली.धडकेत साकीर अली यांचा जागीच मृत्यू झाला.
धडक इतकी भयावह होती की साकीर अली यांचा
शरीर गाडीच्या समोरील भागात अडकला.त्यास बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.दोन्ही जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,दोघांची प्रकृती गंभीर आहे.याप्रकरणी देवलापार पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक टीकाराम जाधव करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!