- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या
पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा येथे गुरुवार २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती तथा लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.जयंती दिनाचे औचित्य साधून शाळेच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी गांधीजींचे विचार,शास्त्रीजींचे साधेपण व त्यांच्या कार्याचा वारसा यावर प्रेरणादायी भाषणे सादर केली.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यातील देशभक्ती व समाजसेवेची भावना वृद्धिंगत केली.तत्पूर्वी शाळेच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आला.विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे घोषवाक्ये दिली.याशिवाय विविध विद्यार्थी स्पर्धा जसे की निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्रशांत पत्रे शिक्षक तज्ञ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य होमराज मुळे,इर्शाद शेख,कैलास कोल्हे,रागिणी खरकाटे,सुभाष मुळे,प्रशांत पत्रे,शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण,शिक्षक मुजाहिद पठाण,शिवराम हाके,
परीष मानकर,शिक्षिका अपेक्षा देशपांडे,सोनीया खरकाटे यांचेसह प्रतिष्ठित नागरिक तथा बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisement -

