Monday, October 12, 2026
Homeभंडारापायाला चिखल माखल्याने धुण्यासाठी मोठ्या नहराजवळ गेले अन् विपरीत घडले; पती-पत्नीचा मृत्यू..

पायाला चिखल माखल्याने धुण्यासाठी मोठ्या नहराजवळ गेले अन् विपरीत घडले; पती-पत्नीचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेत पाहण्यासाठी शेतीवर गेले असता पायाला चिखल माखल्याने पाय धुण्यासाठी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याजवळ(मोठा नहर)गेले असता पत्नीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली.पत्नीला वाचविण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी मारली,मात्र पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून जात दोघांचाही करून अंत झाल्याची घटना काल,रविवार ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोरंभी गाव नजीकच्या शेत शिवारात घडली.स्वप्नील अशोक बनकर वय २९ वर्षे व पत्नी प्रज्ञा बनकर वय २५ वर्षे रा.कोरंभी असे मृत पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
दोघेही पती-पत्नी कामासाठी नागपूर येथे राहत होते.ते दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्ताने पवनी तालुक्यातील कोरंभी येथे स्वगावी परतले होते.रविवारी दोघेही पती-पत्नी शेत पाहण्यासाठी शेतीवर गेले असता पायाला चिखल लागल्याने गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यात पाय धुण्यासाठी उतरत असतांनाच पत्नीचा पाय घसरला.पत्नी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असतांनाच पतीने पाण्यात उडी घेतली.मात्र,पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने दोघेही वाहून गेले.दरम्यान, दोघांचेही प्रेत वाहून जातांना काहींना दिसले.घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दोघांचा शोध घेण्यासाठी गोताखोरांची मदत घेण्यात आली.मात्र,पाण्याची खोली,प्रवाहाचा वेग आणि रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले.परत आज शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.या प्रकरणी पवनी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात आजपासून बेमुदत उपोषण.. -सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांचेसह प्रा. मुनिश्वर बोरकर व कार्यकर्ते बसले होते बेमुदत उपोषणाला..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून जागा अकृषक केली व बेकायदेशीर प्लॉट पाडून विक्रीचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून...

गडचिरोलीच्या जलसंधारण व कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे नवी दिल्लीत सादरीकरण.. -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडली जिल्ह्याची कामगिरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील जलसंधारण, दुष्काळ प्रतिकारक्षमता आणि कृषी मूल्यवर्धनाच्या उपक्रमांचे सादरीकरण...

मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देसाईगंज येथे महाविकास आघाडीचे निदर्शने आंदोलन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी,याकरिता आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी...

धावत्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग; दोघांचा ट्रकमध्येच होरपळून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-फुलकोबी घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागून क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.आग इतकी वेगाने पसरली की...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!