Sunday, September 20, 2026
Homeवर्धापाच हजाराची लाच घेतांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी(APO) अडकला एसीबीच्या जाळ्यात..-मजुरांच्या मस्टरचे पैसे...

पाच हजाराची लाच घेतांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी(APO) अडकला एसीबीच्या जाळ्यात..-मजुरांच्या मस्टरचे पैसे काढण्याकरिता मागितली लाच…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

वर्धा :- सिंचन विहिरीचे खोदकाम केल्यानंतर मजुरांच्या मस्टरचे पैसे काढण्याकरिता लाभार्थ्यांना आर्वी पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. हि रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.आर्वी पंचायत समितीच्या सहायक कार्यक्रम अधिकारी जयमाला कोहळे यांच्यावर लाच स्वीकारताना वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली आहे.तक्रारदार यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत २०२३-२४ मध्ये पंचायत समिती आर्वीकडून सिंचन विहीर मंजूर झाली.तक्रारदाराने विहिरीचे खोदकाम केले.मजुरांनी जे खोदकाम केले.त्याचे मस्टर त्यांनी पंचायत समितीकडे सादर केले.ते मजुरांच्या मस्टरचे पैसे काढून देण्याकरिता सहायक कार्यक्रम अधिकारी जयमाला त्रीलोकचंद कोहळे यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली.याबाबत  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कारवाई दरम्यान जयमाला त्रिलोकचंद कोहळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून पाच हजार रुपये लाच  स्वीकारली.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोहळे यांच्याकडून पाच हजार रुपये हस्तगत करत ताब्यात घेतले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!