Thursday, August 6, 2026
Homeदेसाईगंजअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार…-देसाईगंज तालुक्याच्या कसारी फाट्या नजीकची आजची घटना…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार…-देसाईगंज तालुक्याच्या कसारी फाट्या नजीकची आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या पूर्वेस कुरखेडा मार्गे १४ किलोमिटर अंतरावर असलेल्या कसारी फाट्या नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज,शुक्रवार दिनांक- १७ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार,अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव कैलास मधुकर नाकाडे,वय अंदाजे ४५ रा.बोळधा, ता.देसाईगंज, जिल्हा- गडचिरोली असे आहे.देसाईगंज-कुरखेडा मार्गावरून   नेहमी सुसाट वेगाने वाहने जात असतात.यामध्ये अवजड वाहने,दुचाकी,चारचाकी वाहनांचा समावेश होतो.अशातच आज कसारी फाट्या नजिक गावातील काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला दुचाकी पडलेल्या अवस्थेत तसेच कैलास नाकाडे हे रक्त बंबाळ अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत दिसून आले.काही नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता कैलासच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे व डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे घटनास्थळी दिसून आले.घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास देण्यात आली.लगेच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून नाकाडे यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविण्यात आले.परंतु नेमका अपघात कशामुळे झालाय? हे अजून पर्यंत कळले नाही.मात्र,सदर घटनेवरून अज्ञात वाहन धडक देऊन प्रसार झाला असावा; असा कयास वर्तविण्यात येत आहे.पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!