- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका पाच वर्षीय मुलीवर दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना काल,सोमवारी ११ नोव्हेंबरला उघडकीस आली. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडित मुलीचे वडील ट्रक चालक आहेत.रविवारी १० नोव्हेंबरला त्यांची पत्नी टीईटी परीक्षा देण्यासाठी चंद्रपूरला गेली होती.परीक्षेनंतर पत्नीला बल्लारपूरला आणायचे असल्याने वडिलांनी मुलीला शेजारच्या कुटुंबात ठेवले होते.सायंकाळी आई-वडील घरी
असता त्यांच्या पत्नीने मुलीला नाश्ता करायला आवाज दिले.मुलीला अस्वस्थ बघून आईने विचारले असता तिने १६ वर्षीय मुलाने केलेल्या कृत्याची माहिती दिली.एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी नेले असता लैंगिक शोषण झाल्याचे पुढे आले.रविवारी मुलीच्या आई-वडिलांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिले असून पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.
- Advertisement -

