Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपतीला व्हॉट्सॲप कॉल करून 'मी चालली' असे म्हणत केले पलायन..!

पतीला व्हॉट्सॲप कॉल करून ‘मी चालली’ असे म्हणत केले पलायन..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-सध्या स्थितीत विवाहासाठी मुली भेटणे कठीण झाले आहे.अनेक तरुण ‘बाबा लगीन’ म्हणून एका रांगेत उभे होऊन माझे लगीन कई होईल,अशी आशा बाळगून आहेत.अश्यातच आता ज्यांचे विवाह झालेत त्यांना बायको टिकवणे अवघड होऊ लागले आहे.त्यामुळे ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी अनेकांची अवस्था होऊ लागली आहे.त्यातच पती परमेश्वर असूनही अनेकजण पलायन करतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे एका चार वर्षाच्या मुलीची आई नागपूरच्या रेल्वे स्थानकाहून गेली ती परतलीच नाही.नागपूरच्या हुडकेश्वर ठाण्यांतर्गत वास्तव्यास असणारे कुटूंब मिळेल ते काम करून गुजारा करतात.३१ वर्षीय महिला,तिचा पती व एक चार वर्षाची मुलगी असा छोटा परिवार आहे.पती वेल्डिंगचे काम करतो.आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांच्यात धुसफूस व्हायची. अश्यातच ९ जून रोजी महिलेने तिच्या मुलीला खाऊ घातले आणि दुपारी दुचाकीने निघाली.रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली.स्थानकाच्या आत जात असतांना तिने पतीला व्हॉट्सॲप कॉल केला. ‘मी चालली,रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली आहे; असे सांगून तिने फोन कट केला.पती धावपळ करीत घरी पोहोचला.मुलीची विचारपूस केली.आई घरी परतलीच नाही,असे सांगताच त्याने थेट रेल्वे स्थानक गाठले.पार्किंगमध्ये पत्नीची दुचाकी दिसली. नंतर त्याने पत्नीचा शोध घेतला.मात्र,रेणुका कुठेच सापडली नाही.घाबरलेला पती लोहमार्ग ठाण्यात पोहोचला. लोहमार्ग पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांना घटनेची माहिती दिली.त्यांनी लगेच तक्रार नोंदविण्याचे निर्देश दिले.प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार ऋषिकांत राखुंडे यांच्याकडे दिला.राखुंडे यांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,महिला रेल्वेस्थानकाच्या आत जातांना  दिसली.नंतर फलाट क्रमांक एकवर दिल्लीकडे जाणाऱ्या तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ती बसतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली.ती दिल्लीमार्गे निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले असून लोहमार्ग पोलिस मोबाईल लोकेशन मिळवून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.चार वर्षाच्या पोटच्या पोरीला सोडून व रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवलेली आहे; असे पतीला सांगणारी महिला कुणातरी सोबत पळून गेल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे व त्यादिशेने तपास सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!