- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-दारू शौकिणांसाठी
दारूची लतच लय भारी म्हणावी लागेल.कुणी बारमध्ये बसून पितो तर कुणी एखाद्या हॉटेलात वा एखाद्या निर्जनस्थळी जाऊन दारू ढोसत असतो. मात्र,एखादा व्यक्ती चक्क न्यायालय परिसरातील शौचालयात दारू पीत असेल तर..अश्यासाठी दारूचे सेवन करणे किती जीवनावश्यक झाल्याचे दिसून येते.असाच प्रकार कुरखेडाच्या दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात काल,बुधवारी उघडकीस आला.पठ्ठ्याने ब्रम्हपुरी सोडून चक्क कुरखेडा न्यायालयातील शौचालयात दारू पिण्यास सुरुवात केली.दारू पीत असतांनाच न्यायालयीन कर्मचारी व सुरक्षा पोलिसांनी पकडुन कुरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.राजू केशवराव मेश्राम वय ५५ वर्षे, रा.ब्रम्हपूरी,जि.चंद्रपूर असे न्यायालय परिसरात दारू ढोसणाऱ्यास इसमाचे नाव असून तो ब्रम्हपुरी येथील एका खासगी वकीलाकडे वाहनचालक म्हणून काम करतो.
माहितीनुसार,ब्रम्हपुरी येथील खासगी वकील आणि वाहनचालक राजू मेश्राम हे काल बुधवारी कुरखेडाच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात काही कामानिमित्त आले होते.वकील आपल्या कामामध्ये असतांना वाहनचालकास दारू पिण्याची इच्छा झाली.अश्यातच त्याने दुसरे ठिकाण न निवडता चक्क न्यायालय परिसरातील शौचालयाची निवड केली व आता झिंगाट करू असा निर्धार केला.मात्र,केलेला निर्धार निष्फळ ठरला आणि रंगेहाथ पकडल्या गेला.न्यायालयीन कर्मचारी व सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याला कुरखेडा पोलिसांच्या स्वाधीन करून कुरखेडा पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करीत त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
- Advertisement -

