Tuesday, June 23, 2026
Homeदेसाईगंजनाट्य कलावंतांना नियमित मानधन द्यावे-जयदेव माटे 

नाट्य कलावंतांना नियमित मानधन द्यावे-जयदेव माटे 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):- झाडीपट्टी नाट्य रंगभुमीच्या अनेक नामवंत नाट्य कलावंतांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातुन ग्रामिण भागातिल ज्वलंत समस्या समाजा समोर मांडुन समाज प्रबोधनाचे कार्य केले.मात्र उतरत्या वयात नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे वयाचे ५० वर्षे पुर्ण झालेल्या नाट्य कलावंतांना नियमित मानधन मिळावे; असे मत प्रसिद्ध नाट्य लेखक,निर्माता दिग्दर्शक जयदेव उर्फ राजु माटे यांनी व्यक्त केले.              झाडी पट्टी रंगभुमिवर पंख तुटले पक्षिनीचे,पवित्र गंगा इश्काची,कस्तुरीच्या केसात भांग अत्तराचा,सख्या मदन पेटला उरी,सदा बाईवर फिदा,बांधलं बाईनं घुंगरु वाजलं पाटलाच डमरु,इज्जत विकली बाळासाठी अश्या विविध नाट्य लेखनाद्वारे नवोदित कलावंतांना नाट्य क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणारे ख्यातनाम नाट्य लेखक,दिग्दर्शक निर्माता जयदेव उर्फ राजु माटे म्हणाले की,झाडीपट्टी नाट्य क्षेत्रातिल कलावंत पुणे,मुंबईच्या नाट्य अकॅडमीतील प्रशिक्षित कलावंतांनाही भुरळ पडेल असे अभिनय करतात.परिसरातिल समस्यांचे सादरीकरण करुन सातत्याने समाज प्रबोधन करीत असतात.पुणे,मुंबई सारख्या ठिकाणी नाट्यगृह उपलब्ध असल्याने त्या भागातील कलावंतांना नियमित सादरीकरण करुन आपली आजिविका भागविणे सोपे होते.याउलट झाडीपट्टी नाट्य क्षेत्रात नाट्यगृह उपलब्ध नसल्याने ग्रामिण भागात आयोजित केलेल्या नाट्य प्रयोगावरच आपले उदरनिर्वाह करावे लागते आहे.त्यातही पुणे मुंबईचे कलावंत टिव्ही सिरियल किंवा एखाद्या चित्रपटात काम केल्याचा उपापोह करुन मजल मारुन जातात. त्यामुळे झाडीपट्टी नाट्य कलावंतांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो आहे.नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलावंतांच्या मानधनाचे अर्ज शासन दरबारी प्रलंबित असुन,त्यांना जीवन जगणे सोयीचे होईल; यासाठी शासनाने ५० वर्ष पुर्ण केलेल्या नाट्य कलावंतांना नियमित मानधन द्यावे;असे मत जयदेव उर्फ राजु माटे यांनी व्यक्त केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!