- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एका ५५ वर्षीय नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एल.देशपांडे यांनी २० वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. मधुकर हरी रंगारी रा.ओपारा ता.लाखांदूर,जि.भंडारा असे शिक्षा झालेल्याचे आरोपीचे नाव आहे.पीडित अल्पवयीन मुली दुपारी सलवार शिवून झाला की नाही हे पाहण्यासाठी जात असतांना ३ ऑगस्ट २०२१ रोजी लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास नराधमाने दोन्ही मुलींना घरात बोलावून अत्याचार केला होता.आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वीर चहांदे यांनी केले होते.त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून नराधमास साडे तीन वर्षानंतर २० वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे दुर्गा तलमले यांनी साक्षदार तपासले.
- Advertisement -

