चंद्रपूर :-शहराच्या एका देहविक्री करणाऱ्या महिलेला धमकावून एक लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या तब्बल सहा पत्रकारांवर रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून सहा पैकी चार जणांना अटक केली आहे; तर दोघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.प्रकरणी अविनाश मनोहर मडावी वय ३३ वर्षे,रा.इंदिरानगर,चंद्रपूर, राजेश नारायण निकम वय ५६ वर्षे,रा.जमनजेट्टी पाटील वाडी,कुणाल यशवंत गर्गेलवार वय ३७ वर्षे,रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड,चंद्रपूर व राजू नामदेवराव शंभरकर वय ५७ वर्षे,रा.लालपेठ कॉलनी, चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे असून यातील कुणाल गर्गेलवार याचेवर घरफोडी व चोरीचे गुन्हे असल्याची माहिती आहे.तर फरार आरोपींमध्ये सचिन ढगे व योगिता पाटेकर यांचा समावेश आहे.पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०८(५),३३३,३(५)अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.काल गुरुवारी चौघांनाही ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.खंडणी बहाद्दर सहा पत्रकारांनी चंद्रपूर शहरातील देहविक्री करणाऱ्या महिलेच्या घरी जात धमकीवजा बोलणी करून एक लाख रुपयांची खंडणी वसूल केली.मात्र,फिर्यादी महिलेने याबाबत घडलेला सर्व प्रकार शहरातील रामनगर पोलिसांना सांगत तक्रार दिली.रामनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पत्रकारांच्या टोळीचा शोध सुरू केला आणि चार जणांना अटक केली.सदरची कारवाई ठाणेदार आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे,नीलेश वाघमारे,हनुमान उगले, जितेंद्र आकरे,शरद कुडे,आनंद खरात,लालू यादव,बाबा नैताम,मनीषा मोरे, रविकुमार ढेंगळे,पंकज ठोंबरे,प्रफुल्ल पुप्पलवार आदींनी केली.
देहविक्री करण्याऱ्या महिलेकडून खंडणी वसूलणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल; चार अटकेत,दोघे फरार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

