- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पावसाळा संपून नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपण्यास आला.तरीही अद्याप थंडीचा प्रभाव जाणवला नाही.अश्यातच आता रात्रीचा पारा घसरायला लागला आहे.त्यातच हवामान विभागाने उद्या,शनिवार ८ नोव्हेंबरपासून कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंशांची घसरण होऊन गुलाबी थंडी जाणवायला लागेल,असे निरीक्षण नोंदविले आहे.विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातही थंडीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.सध्या उत्तर भारतात बर्फवृष्टी होत आहे.मंगळवारच्या हलक्या सरीनंतर दोन दिवसांपासून विदर्भाचे आकाश निरभ्र झाले आहे. महाराष्ट्रातही आकाश निरभ्र होईल.समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत उत्तर भारतातून ताशी १० किलोमिटर वेगाने उत्तरी थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत.येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या कोणताही अटकाव जाणवत नसल्याने विदर्भातील पारा आणखी घसरेल.असेही हवामान खात्याने म्हटले आहे.मंगळवार ११ नोव्हेंबरपासून तर पहाटेचे किमान तापमानात ३ ते ४ डिग्रीने घसरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.सध्या विदर्भाचे दिवसाचे तापमान ३० ते ३३ अंशांच्या सरासरीत आहे.काही ठिकाणी कमाल तापमानात अंशतः वाढ झाली आहे,तर किमान तापमानात घट झाली आहे.मात्र,अद्याप रात्रीचे तापमान सरासरीच्या वर आहे.ते खाली येईल,असा अंदाज आहे. तर येत्या १७ आणि १८ तारखेपासून थंडीत वाढ होईल. नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान १० ते ११ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्यापासून सर्वत्र गुलाबी थंडी जाणवणार आहे.
- Advertisement -

