Thursday, May 28, 2026
Homeमुंबईजमीन गैव्यवहारप्रकरणी तहसीलदारासह दुय्यम निबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांची थेट कारवाई..

जमीन गैव्यवहारप्रकरणी तहसीलदारासह दुय्यम निबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांची थेट कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर मोक्याची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये विकल्याचा आणि त्यासाठी केवळ ५०० रुपयांची स्टँप ड्युटी आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.सदरची जमीन सुमारे १८०० कोटी रुपयांची असल्याचा दावा करण्यात आला आहे.प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.विरोधकांनीही सरकारवर टीकास्त्र डागले आहे.या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.प्राथमिक चौकशीतील गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये, ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम १९७९’ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत,पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे आज,गुरुवार ६ नोव्हेंबरला तातडीने निलंबन करण्यात आले आहे.त्यांच्यावर विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.जमिनीची नोंदणी बेकायदेशीर असल्याचा दावा केला जात असल्याने मुद्रांक शुल्क विभागानेही स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या कारवाईचा भाग म्हणून हवेली क्रमांक-३ चे दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि भूमी अभिलेख विभाग(लँड रेकॉर्ड्स) यांच्याकडून या व्यवहाराची संपूर्ण माहिती मागवली असून योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!