Tuesday, September 1, 2026
Homeभंडारास्कूल बसचा अपघात; २३ जण थोडक्यात बचावले..!

स्कूल बसचा अपघात; २३ जण थोडक्यात बचावले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्परला धडक बसणार इतक्यात स्कूल बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेताच रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकल्याने बसच्या समोरील भाग तुटफुट होऊन बसमधील २२ विद्यार्थ्यांना किरकोळ जखम झाल्याची घटना आज,गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पवनी तालुक्यातील निलज फाटा नजिक घडली.बसमध्ये २२ विद्यार्थ्यांसह एक केअरटेकर असे २३ जण पवनीवरून भिवापूरच्या विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत जात असतांना सदरचा अपघात घडला.अपघात घडताच घटनास्थळी ग्रामस्थांचा मोठा जमाव गोळा होत विद्यार्थ्यांना बसमधून सुखरूपपणे बाहेर काढून तातडीने  रुग्णालयात हलविण्यात आले.तपासणी अंती विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले.प्रकरणी स्कूल बस चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली आणि २३ जण थोडक्यात बचावले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!