Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्याच्या पोटगावची पुनम कुथे "राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार-२०२५" ने सन्मानित......

देसाईगंज तालुक्याच्या पोटगावची पुनम कुथे “राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार-२०२५” ने सन्मानित… – आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटीलांची उपस्थिती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-स्वच्छतेचे जनक,थोर समाजसेवी राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीदिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील “पहाट फाऊंडेशन” च्या वतीने नुकतेच वर्धमान जैन भवन,शेगाव येथे “राज्यस्तरीय ग्रामविकास परिषद” आयोजित करण्यात आली होती.सदर परिषद कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील क्रीडा,समाजसेवा,सांस्कृतिक,शिक्षण,कला,राजकीय, पर्यावरण अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला. सदर पुरस्कार सोहळ्यास गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील गेली १० वर्षांपासून पूर्व विदर्भातील चारही जिल्ह्यात विविध सामाजिक, समाजपयोगी उपक्रम राबवित असलेल्या व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा समाजसेविका कुमारी पुनम नानाजी कुथे यांना “राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार- २०२५”  देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्काराच्या स्वरूपात सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ आणि सन्मानपत्र देण्यात आले.सदर कार्यक्रमास आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त  भास्कर पेरे पाटील (ग्रा.पं.पाटोदा,छ.संभाजीनगर), श्वेता परदेशी ( मिसेस इंडिया विजेत्या) लातूर,असे अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते.
जागतिक स्तरावरील ५० पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित👇
विषमतेला बाजूला सारत,समतेचा वसा घेऊन, मानवतेसाठी करीत असलेल्या समाजसेवेच्या कार्याला लक्षात घेत,देश-विदेशातील ५० पेक्षा जास्त नावाजलेल्या संस्थांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कार देऊन कुमारी.पुनम कुथे यांना आजवर सन्मानित केलेले आहे.यामध्ये विशेषतः राज्यस्तरीय आदर्श युवती पुरस्कार,सावित्रिज्योती राज्यस्तरीय पुरस्कार,जिनिअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार,युथ आयकॉन अवॉर्ड,नॅशनल बेस्ट युथ सोसियल अवॉर्ड,अश्या ५० पेक्षा जास्त जागतिक स्तरांवरील पुरस्कारांवर यांनी आपले नाव कोरून,गडचिरोली जिल्ह्याची व पोटगाव या लहानशा गावची सामाजिक क्षेत्रात एक वेगळीच ओळख,संपूर्ण देशात निर्माण केलेली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!