Friday, July 31, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज औधोगिक प्रशिक्षण संस्था येथे 'छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मेळावा' संपन्न…

देसाईगंज औधोगिक प्रशिक्षण संस्था येथे ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मेळावा’ संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे शुक्रवार,दिनांक- २१ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता च्या सुमारास “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळावा” पार पाडला.

सदर मेळाव्याचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.गजबे यांनी मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना सांगितले की,स्वत:च्या आवडीचे व इच्छाशक्तीचे क्षेत्र ओळखून त्यानुसार व्यवसायभिमुख अभ्यासक्रम घेवून जास्तीत जास्त रोजगार व स्वयंरोजगारकडे वळावे.

याप्रसंगी प्रमुख अतिथि म्हणून पंचायत समिती देसाईगंज गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे,तसेच विशेष अतिथि म्हणून आफताब आलम खान व्यवस्थापक ए.ए.एनर्जी लि.वडसा,मुरलीधर सुंदरकर सुभाष इंजि.वडसा,दामोधर शिंगाडे प्राचार्य आदर्श विद्यालय वडसा,प्राध्यापक संजय कुथे वडसा व इतर मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्यात दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधि,व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र,आयटीआय तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया,उच्च शिक्षणाच्या संधी,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.रोजगार आणि स्वयंरोजगार व शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जांच्या विविध योजनेविषयी स्टेट बँकेचे फील्ड ऑफिसर अनुराग बोरकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी व पोलिस भरती,अग्निवीर योजनेविषयी कोमल माने पोलिस उपनिरीक्षक देसाईगंज यांनी माहिती दिली.

सदर सुवर्णसंधीचा आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ४५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य सुरेश एस.चौधरी यांनी केले.तर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कार्यक्रम करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो समन्वयक सी.एम.गरमळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन रासेयो सहसमन्वयक व्ही.वाय.नागमोती यांनी केले.कार्यक्रमाकरिता गटनिदेशक आर.एम.गोतमारे, श्रीमती एम.एस.जाधव,मुख्य लिपिक जी.आर.वांढरे, शिल्पनिदेशक ए.व्ही.भोले,सी.डी.समर्थ,के.एस. उमक,आर.बी.भोयर,टी.यु.सोयाम,डी.सी.बोकडे,बी. बी.घरडे,कु.एम.सी.चौदंते,आर.वाय.कऱ्हाडे,श्रीमती एस.एस.प्रधान,श्रीमती.एन.डी.भडके व संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग एन.एस.एस.स्वयंसेवक,संस्थेतील तसेच वसतिगृहातील प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य लाभले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!