Wednesday, July 29, 2026
Homeदेसाईगंजराज्यात मुस्लिम समाजाला विविध क्षेत्रात ५ टक्के आरक्षण द्या- गडचिरोली सपाची मागणी..

राज्यात मुस्लिम समाजाला विविध क्षेत्रात ५ टक्के आरक्षण द्या- गडचिरोली सपाची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- राज्यात मुस्लिम समाजाची स्थिती अत्यंत वाईट आहे.शिक्षणात त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.सहा ते १४ वयोगटातील ७५ टक्के मुले शाळेच्या पहिल्या काही वर्षांतच शिक्षणापासून वंचित राहतात.केवळ दोन ते तीन टक्के मुले उच्च शिक्षण घेतात.दारिद्र्यरेषेखालीही मुस्लिमांचे प्रमाण अधिक आहे.सरकारी नोकऱ्या, तसेच खासगी नोकऱ्यांतही प्रमाण दोन ते अडीच टक्के आहे.त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांना ५ टक्के आरक्षण मिळावे; या मागणीसाठी समाजवादी पार्टी अल्पसंख्यांक विभाग गडचिरोली यांच्या तर्फे देसाईगंज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचा विचार करता,मुस्लिम समाज हा नोकरींमध्ये, शिक्षणात तसेच इतर क्षेत्रात मागासलेला आहे.मुस्लिम समाजाला समोर आणण्यासाठी तसेच सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आरक्षणाची अत्यंत गरज आह.आजच्या घडीला अनेक समाज बांधवांना आरक्षण देण्यात आले आहे.मात्र मुस्लिम समाज बांधवांना पाहिजे त्या प्रमाणात आरक्षण दिला जात नसल्याने एकप्रकारे समाजावर अन्याय केला जातो आहे; त्यामुळे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मुस्लिम समाज बांधवांना ५ टक्के आरक्षण देण्यात यावे; अशा मागणीचे निवेदन देसाईगंज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने राज्याचे राज्यपाल तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

तसेच मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळण्याकरिता पुढील कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये समाजवादी पार्टी अल्पसंख्यांक विभागातर्फे मोठा आंदोलन उभा करणार असल्याचे  अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष खलील खान यांनी सांगितले.

सदर निवेदन सादर करतेवेळी समाजवादी पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील खान, जिल्हा उपाध्यक्ष महेबूब खान,मुजीब शेख, जिल्हा कोषध्यक्ष जिब्राईल शेख,जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजरा बेगम, गडचिरोली महिला संघटिका सीमाताई डोंगरे,अल्पसंख्यांक विभाग देसाईगंज तालुकाध्यक्ष मुन्ना शेख,जिल्हा कार्यकारिणी सदस्य जावेद खान, अल्लारखा खान,प्रमोद करंडे आदी उपास्थित होते. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!