उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- भद्रावती तहसीलच्या बरांज मोकासा गावात असलेल्या केपीसीएल कंपनीच्या कोळसा खाणीतील अधिकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे आणि निलेश भालेराव यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही मुख्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिस जोमाने शोध घेत आहेत.मात्र,काल,शुक्रवारी सायंकाळपर्यंत दोघांनाही अटक करणे शक्य झाले नव्हते.दरम्यान, अधिकाऱ्यांवर झालेल्या मारहाणीचे व्हायरल झालेले व्हिडीओ फुटेज पाहून पोलिसांनी अन्य ७ आरोपींचा शोध सुरू केला असून,पोलिसांनी ३ संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची कसून चौकशी केली. आरोपी प्रवीण काकडे याने वरोरा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे अशी चर्च सुरू आहे.

