Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरदेशी कट्टे अन् जिवंत काडतुसे कशासाठी? वाढती गुन्हेगारी.. - दोघेजण अटकेत..

देशी कट्टे अन् जिवंत काडतुसे कशासाठी? वाढती गुन्हेगारी.. – दोघेजण अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र आहे.तलवार,बंदूक,हत्या व इतर अपराधिक सीमा ओलांडल्या जात आहेत.पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.मात्र,काहीजण सुधरण्याचे नावच घेत नाही. अश्याच प्रकारे नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरात दोन देशी कट्टे व दोन जिवंत काडतुसे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी जप्त केली आहेत.प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.३९ वर्षीय राहुल दिनेश डंगोरे रा.पंडित दीनदयाळ वॉर्ड, बल्लारपूर व ३० वर्षीय ईस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख रा.रेल्वे नगर वॉर्ड,बल्लारपूर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.या दोघांवर बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जुनी पेपर मिल कॉलनी परिसरात सापळा रचून अवैधरित्या देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या राहुल डंगोरे याला अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचा लोखंडी कट्टा जप्त करण्यात आला.तर दुसऱ्या कारवाईत रेल्वे नगर वॉर्ड येथील नवाब शेख हा आपल्या घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून असल्याच्या माहितीवरून बल्लारपूर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीचे ७ एमएम बोर असलेले अग्निशस्त्र व दोन पितळी धातूचे दोन काडतूस जप्त करून ईस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख यास अटक केली.पहिली कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार,बलराम झाडोकार, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर,किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे,किशोर वाकाटे,शेखर माथनकर,प्रमोद डंभारे,रिषभ बारसिंगे आदींनी केली.तर दुसरी कारवाई पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे,शब्बीर पठाण,रणविजय ठाकूर,सुनील कामतकर,पुरुषोत्तम चिकाटे,सत्यवान कोटनाके,संतोष दंडेकर आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!