- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-कराचा वेळेत भरणा न करणाऱ्या देसाईगंज नगरपरिषद हद्दीतील थकीत करधारकांवर साहित्य जप्तीची कारवाई नगरपरिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.ज्यांच्याकडे चालू तसेच बऱ्याच कालावधीपासून थकीत कर येणे बाकी आहे; अशांचे साहित्य जप्त करण्यात येत आहे.यामध्ये कूलर, टीव्ही,सोफा,टेबल,खुर्च्या व इतर साहित्य जप्त करण्यात येत आहे.साहित्य जप्त करून लीलाव करण्यात येणार आहे व लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून वसुलीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात आंबेडकर वार्ड,भगतसिंग वार्ड तसेच नैनपूर वार्डामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्नमवार वार्ड,किदवाई वार्ड,जवाहर वार्ड,शास्त्री व चव्हाण वार्डामध्ये जप्ती मोहीम राबविण्यात येणार आहे.तर तिसऱ्या टप्प्यामध्ये माता वार्ड,शिवाजी,तुकूम, कस्तुरबा, गांधी,हनुमान,विर्शी या वार्डामध्ये मोहीम राबविण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी कराचा भरणा वेळेत करावा व होणाऱ्या कारवाईला टाळावे तसेच यानंतरही कर थकीत ठेवल्यास १ एप्रिल पासून दोन टक्के प्रती महिन्याप्रमाणे २४ टक्क्यापर्यंत शास्ती आकारण्यात येणार असल्याचे देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांनी स्पष्ट केले आहे.
थकीत करधारक रक्कम भरणा करीत नसल्याने
नगरपरिषदेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
शहरात विविध प्रभागात ५ वसुली पथक फिरत असून कार्यालयात २ पथक वसुली करीत आहेत.जप्तीचे पथक मुख्याधिकारी यांनी तयार केले असून सदर पथक थकीत करदाते यांचे घरी जाऊन जप्ती मोहीम राबवीत आहेत.सदर पथकामध्ये स्वप्नील हमाने कर निरीक्षक, प्रफुल हटवार कर व प्रशासकीय अधिकारी, संगणक अभियंता प्रशांत चिचघरे,अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन,सहाय्यक नगर रचनाकार दिव्या परतेकी,कर लिपिक दिनकर खेत्रे,मुकेश सोनेकर,शैलेश खांडेकर,विमल सोनावणे व इतर कर्मचारी वृंदांचा समावेश आहे.
- Advertisement -

