Wednesday, June 24, 2026
Homeचंद्रपूरतीनजण नदीत बुडाले; वडील मुलगी आणि भाची..

तीनजण नदीत बुडाले; वडील मुलगी आणि भाची..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप- लेकीचा तसेच भाचीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या धानोरा गावाजवळील वर्धा नदी तीरावर घडली.राजू कोडापे वय ४० वर्षे,मुलगी अर्पिता कोडापे वय १२ वर्षे आणि भाची प्रियांका मडावी वय १४ वर्षे असे नदीत बुडून मृत पावलेल्यांची नावे असून बुडालेल्या तिघांपैकी अद्याप एकाही व्यक्तीचा मृतदेह सापडलेला नाही. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.स्थानिक नागरिकांच्या मदतीने आज दिवसभर शोधमोहीम सुरू करण्यात आली.मात्र,अंधार वाढत गेल्यामुळे रात्री उशिरा शोधकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रशासनाच्या वतीने उद्या,बुधवार सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असून स्थानिक बचाव पथक आणि पोलीस प्रशासनाकडून शोधकार्य राबविण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील खामोना येथील राजु कोडापे यांची बहीण धानोरा येथे राहात असल्याने ते आपल्या मुलीसह बहीणीकडे धानोरा येथे गेले होते.आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-गडचांदूर मार्गावरील धानोरा गावातून वाहणाऱ्या वर्धा नदीवर राजू कोडापे आपली मुलगी अर्पिता कोडापे,भाची प्रियांका मडावी तसेच रोहन मडावी व सलोनी मडावी यांच्यासह कपडे धुण्यासाठी गेले होते.राजू कोडापे त्यांची मुलगी अर्पिता कोडापे व भाची प्रियांका मडावी हे तिघे जण अंघोळ करण्यासाठी नदीत गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले.यावेळी त्यांच्यासोबत असलेले रोहन मडावी व सलोनी मडावी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु,त्यांना अपयश आले.घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!