Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरतिघांना वाचवले खरी; पण स्वतःच बुडाला.. - २० वर्षीय तरुणाचा खड्ड्यात बुडून...

तिघांना वाचवले खरी; पण स्वतःच बुडाला.. – २० वर्षीय तरुणाचा खड्ड्यात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मूर्तिकार म्हणून परिचित असलेल्या एका २० वर्षीय तरुणाचा तीन मुलांना खोल खड्ड्यातील पाण्यातून वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील पुयारदंड शिवारात घडली.आयुष नरेश बावणे वय २० वर्षे,रा.जुनी भिसी, ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे,तर १२ वर्षीय दादू रामा वाघधरे,१३ वर्षीय सुमेद सुनिल दिघोरे व समीर वामन मेश्राम रा.चांभार मोहल्ला भिसी,ता.चिमूर अशी मृतक आयुष बावणे याने वाचविलेल्या मुलांची नावे आहेत.
आयुष बावणे व काही मित्र मंडळी नेहमीप्रमाणे काल बुधवारी सकाळच्या सुमारास भिसी येथील चौरस्ता मैदानावर कसरत(व्यायाम)करण्यासाठी गेले होते.कसरत करून झाल्यानंतर परिसराला लागून असलेल्या मुरूम खाणीतील एका खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले.पोहत असतांनाच सोबत असलेली तीन मुले खोल पाण्यात गेल्याने वाचवा-वाचवा म्हणून ओरडू लागले. त्यामुळे आयुषने त्यांच्याकडे धाव घेत तिघांनाही वाचवले.मात्र,स्वतःच खोल पाण्यात बुडाला.यातच त्याचा करून अंत झाला.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून आयुषचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!