उद्रेक न्युज वृत्त :-दिवाळी सणात अतिवृष्टीग्रस्त तथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल,अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली होती. मात्र,राज्याच्या विविध जिल्ह्यातील सुमारे ३५ टक्के शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित असून थेट लाभ हस्तांतरण(डीबीटी)प्रणालीवरील ताणामुळे हे वितरण संथगतीने सुरू असल्याची माहिती आहे.जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तथापि,शासनाकडे पाठविलेल्या याद्यांपैकी फक्त ६५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे.डीबीटी प्रणाली स्वयंचलित असली,तरी याद्या अपलोड करण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक आहे.दिवाळी सणाच्या सुट्टीच्या दिवसातही हे काम सुरू असून उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम मिळावी, यासाठी संबंधित विभागाचे मनुष्यबळ प्रयत्नशील आहेत.सरकारने मादतीसाठी दोन गट तयार केले आहेत.पहिला गट जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा असून,दुसरा गट सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांचा आहे.एका शेतकऱ्याला एकदाच मदत मिळावी,असे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.त्यातच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांनी एकाचवेळी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्याने डीबीटी प्रणालीवर ताण आला. यामुळे मुख्य कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाल्याने खात्यात रक्कम जमा करण्याचे काम काही काळ ठप्प झाले.मात्र, आता ही अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची रक्कम मिळेल,असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
तब्बल ३५ टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

