Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकफ सिरपच्या सेवनाने २४ लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारचा सावध पवित्रा..

कफ सिरपच्या सेवनाने २४ लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारचा सावध पवित्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या संपूर्ण भारतात विक्रीआधी औषधांची तपासणी करणाऱ्या चार मोठ्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत.पण,या प्रयोगशाळांवर कामाचा प्रचंड ताण आहे.यामुळे मध्य प्रदेश सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४ लहान मुलांचा मृत्यू झाला होता.यातील १८ मुले नागपूरच्या एम्स आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.कोल्ड्रिफ(Coldrif),रेस्पीफ्रेश टीआर (Respifresh TR)आणि रीलाइफ (Relife).ही औषधे अनुक्रमे स्रिसन फार्मास्युटिकल्स, रेडनेक्स फार्मा,आणि शेप फार्मा यांनी तयार केली होती.तपासात या सिरपच्या काही बॅचमध्ये डायथिलीन ग्लायकॉल(Diethylene Glycol-DEG)हे विषारी रसायन प्रमाणापेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळले आहे.हे रसायन मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान,मेंदूवर परिणाम आणि विशेषतः लहान मुलांमध्ये मृत्यूपर्यंत धोका निर्माण करू शकते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कंपन्यांनी डिसेंबर २०२४ नंतर तयार केलेल्या सर्व औषधांची काटेकोर तपासणी करावी आणि तपासणी शिवाय कोणतेही औषध बाजारात विकले जाऊ नये याची काळजी घ्यावी,असे म्हटले होते.या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.आता विक्रीआधी प्रत्येक औषधाची  तपासणी केली जाणार आहे.या तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे.राज्यात मोठ्या संख्येने प्रयोगशाळा उभारण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे.या अंतर्गत मध्य प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी करणार आहे. प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी केंद्राकडून मध्य प्रदेश सरकारने २११ कोटी रुपयांची मदत मागितली आहे. उर्वरित निधीची व्यवस्था मध्य प्रदेश सरकार करणार आहे.मध्य प्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीआधी औषधांची तपासणी केली जाईल.तज्ज्ञांच्या परवानगी नंतरच संबंधित जिल्ह्यात औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार आहे.अश्याच पद्धतीने देशातील इतर राज्यांनी नियोजन केले तर लवकरच देशातील प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा सुरू होतील आणि सदोष औषधांच्या विक्रीला आळा घालणे शक्य होईल,अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणे सुरूच राहणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!