Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरतलवारीने केक कापणार तितक्यातच पोलिसांची एंट्री; बर्थडे बॉयसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..

तलवारीने केक कापणार तितक्यातच पोलिसांची एंट्री; बर्थडे बॉयसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-काहीजणांचा वाढदिवस म्हटला की,मौज-मजा, पार्टी आणि नुसता जल्लोष.हे सर्व ठीक आहे; पण, जल्लोषाच्या भरात काही नियमांचे पालनही करणे तितकेच महत्वाचे आहे.मात्र,जोशा-जोशात अनेक तरुण मंडळी होश खोऊन बसतात.अश्याच प्रकारे काही अल्पवयीन व तरुण मुलांनी हातात तलवार घेत केक कापणार तोच पोलिसांची एंट्री झाली आणि बर्थडे बॉयसह चौघांविरुद्ध थेट गुन्हाच दाखल झाला.यात १८ वर्षीय बर्थडे बॉय सक्षम रवि मंत्रीवार, तिरुपती अशोक कटकमवार व २ विधिसंघर्ष बालक यांच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम २५ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुनोना येथे काही अल्पवयीन मुले हातात तलवार घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती गावातील सरपंच यांनी पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच बल्लारपूर पोलिस जुनोनामधील कोपुलवार रिसॉर्टमध्ये गेले असता त्याठिकाणी चार मुले आढळून आली.पोलिसांनी त्यांना इथे कशाला आलात, याबाबत विचारणा केली असता मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही पार्टी करण्यासाठी आलो आहे.पोलिसांनी मुलांना विश्वासात घेत तलवारीबाबत विचारणा केली असता ती तलवार केक कापण्यासाठी आणली असल्याचे सांगितले.पोलिस येत असल्याची माहिती मिळाल्याने ती तलवार रिसॉर्टच्या वॉलकम्पाऊंडच्या बाजूला कचऱ्यामध्ये लपवून ठेवली होती.प्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त करून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!