Saturday, May 23, 2026
Homeचंद्रपूरतरुणाची साडीच्या सहाय्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या..

तरुणाची साडीच्या सहाय्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका ३४ वर्षीय तरुणाने साडीच्या सहाय्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा शहरात सकाळी साडे दहाच्या सुमारास उघडकीस आली.दिपक बाबा पाडे वय ३४ वर्षे,रा.फिरोजशहा कॉलनी,राजुरा,ता.राजुरा,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो आयटी(माहिती तंत्रज्ञान)क्षेत्रात अभियंता म्हणून पुणे येथे कार्यरत होता आणि काही दिवसांपूर्वी पुण्याहून राजुरा येथ आला होता.सकाळचे अकरा वाजत आले तरी दिपक झोपेतून जागा झालेला नव्हता.त्यामुळे दिपकच्या आईने नाश्ता करून दिपकला देण्यासाठी आवाज दिला.दीपक ज्या खोलीत झोपलेला होता,त्या खोलीचे दार बंद असल्याने बराच वेळ आवाज देऊनही दिपकने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे,वडिलांनी दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता दिपक हा खोलीतील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.समोरील दृश्य पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला आणि याबाबत दिपकचा लहान भाऊ अक्षयला माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच अक्षयने घरी धाव घेऊन याबाबत राजुरा पोलिसांना माहिती दिली. प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.पुढील तपास राजुरा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!