Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीसबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष सुटका.. - कुरखेडा तालुक्यातील बलात्कार प्रकरण

सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष सुटका.. – कुरखेडा तालुक्यातील बलात्कार प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात २००९ मध्ये घडलेल्या एका बलात्कार प्रकरणातील आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.सदरचा निर्णय हा गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांनी बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी महारु मडावी रा.चिचटोला,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली याची बलात्काराच्या खटल्यातून निर्दोष सुटका करण्याचा आदेश पारीत केला आहे.प्रकरणाचा निकाल हा काल बुधवारी लागला.
चिचटोला येथील महारु मडावी याच्यावर बलात्काराचा गुन्हा ९ डिसेंबर २००९ रोजी दाखल करण्यात आला होता.कुरखेडा तालुक्याच्या एका गावातील महिला गावानजीकच्या बोडीवर कपडे धुण्यासाठी गेली असता महारु मडावी हा आपल्या शेतातून अंतर्वस्त्र घालून बोडीवर गेला आणि त्यानंतर त्याने पीडित महिलेचा गळा दाबून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना ३ ऑक्टोंबर २००९ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडल्याची पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.त्यानुसार,कुरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता व आरोपी महारु मडावी यास अटक करुन ९ डिसेंबर २००९ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.दरम्यानच्या काळात न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला खरी,पण न्यायालयाच्या सुनावणीत तो वारंवार अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढल्याने पोलिसांनी महारु मडावीस २०२४ मध्ये अटक करुन कारागृहात रवानगी केली.तेव्हापासून आरोपी महारु मडावी हा कारागृहात होता.त्यानंतर,आरोपीने मोफत वकील मिळावा यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे विनंती केली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आरोपीच्या विनंतीवरून ॲड.संजय भट यांनी मोफत विधी सेवा पुरवून बाजू मांडली.प्रकरणात सरकारी पक्षाच्या वकिलांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात सबळ पुरावा सादर केला नसल्याने प्रकरणाचा निकाल आरोपीच्या बाजूने लागला आणि महारु मडावीची निर्दोष सुटका करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!