Wednesday, August 5, 2026
Homeदेसाईगंजडोंगरमेंढा ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत; बिबट्याने दोन बोकड केले ठार..

डोंगरमेंढा ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत; बिबट्याने दोन बोकड केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-मागील काही दिवसांपासून बिबट्याने ग्रामस्थांच्या बोकड,शेळ्या,गायी,कोंबड्या व इतर पाळीव प्राण्यांवर रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून अक्षरशः धुमाकूळ घातल्याने देसाईगंज तालुक्याच्या डोंगरमेंढा येथील ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत आहेत.
देसाईगंज तालुका मुख्यालयापासून बारा किलोमिटर अंतरावर असलेल्या डोंगरमेंढा येथे गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार,बिबट्या हा रात्रीच्या सुमारास गावात येऊन गोठ्यात बांधलेल्या शेळ्या, बोकड तथा गायींवर हल्ला चढवून ठार करीत आहे.नुकतेच दोन दिवसांपूर्वी गावातील नेताजी कोहळे आणि विलास मेश्राम यांच्या गोठ्यातील दोन बोकळांना बिबट्याने ठार केले आहे.पाळीव प्राण्यांसह गावातील कुत्रे,कोंबड्या उचलून नेत फस्त करीत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.बिबट्याच्या दहशतीमुळे गावकरी रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत.एकूणच बिबट्याच्या दहशतीत डोंगरमेंढा गावातील नागरिक रात्र पिंजून काढीत आहेत.त्यामुळे वन विभागाने सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी डोंगरमेंढा ग्रामवासीयांतर्फे करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!